parbhani police arrests two youth in theft case saam tv
महाराष्ट्र

Parbhani : अपघाताचा बनाव... सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याचे पावणे नऊ लाख लुटले, अवघ्या 12 तासांत दाेघांना अटक

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी जिल्ह्यात कारने दुचाकीला धडक देत पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला हाेता. हा प्रकार पाथरी तालुक्यातील कासापुरी फाटा ते नाथ्रा रोडवर घडला हाेता. या घटनेची तक्रार दाखल हाेताच परभणी पाेलिस दलाने अवघ्या बारा तासात मुद्देमालासह दाेघांना अटक केली. (Maharashtra News)

परभणी येथील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून त्याच्या दुचाकीला कारने धडक देत अपघात केला. घटनास्थळी दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून ८ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी (ता. १ फेब्रुवारी) सकाळी ८.३० च्या सुमारास पाथरी तालुक्यातील कासापुरीफाटा ते नाघ्रा रोडवर घडली.

याबाबत अनंता बालासाहेब चिंतामणी (वय ३२ वर्ष, रा. आदर्श नगर, पाथरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनंता चिंतामणी हे चालवत असलेल्या मोटारसायकलला कारने धडक दिली. यात अनंता चिंतामणी व अन्य व्यक्ती खाली पडून जखमी झाले. याचा फायदा घेत पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा अनोळखींनी मुद्देमालाची पिशवी बळजबरीने झटका मारुन हिसकावून घेत पोबारा केला. या घटनेनंतर कार चालक व मोटारसायकलस्वार एकाच दिशेने निघून गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करून गोपनीय माहितीच्या आधारे दत्ता सुंदरराव बोरकर, गणेश रामेश्वर चाळक यांना ताब्यात घेतले. सखाेल चाैकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT