Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू; नातेवाईकानी केली शासकीय रुग्णालयाची तोडफोड

Parbhani News : विजेचा जोरदार झटका बसला होता. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सोनपेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

राजेश काटकर

परभणी : विजेचा जोरदार झटका लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या (Parbhani) सोनपेठ परिसरात घडली आहे. दरम्यान विजेचा झटका बसलेल्या युवकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांकडून लवकर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याचे आरोप करत मेऊटच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. (Live Marathi News)

किसन मस्के असे सदरच्या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. किसन म्हस्के या युवकाला विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसला होता. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सोनपेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात एक देखील (Doctor) डॉक्टर किंवा इतर सहकारी नसल्याने त्यास वेळेवर उपचार मिळू शकले नाही. यात युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रुग्णालयात तोडफोड 

दरम्यान विजेचा धक्का लागलेल्या तरुणावर वेळेवर उपचार न मिळाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकानी सोनपेठच्या ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा पणामुळे युवकाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT