Selu Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : सेलूमध्ये दहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद; पाणी विकत घेऊन भागविताय तहान, पाणीपट्टी न भरल्याने पंप हाऊसला टाळे

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेने जलसंपदा विभागाची नळपट्टी भरलेली नाही. मार्च महिना असल्याने जलसंपदा विभागाकडून देखील वसुली केली जात आहे.

राजेश काटकर

परभणी : सेलू नगर पालिकेने पाणीपट्टीची थकबाकी भरली नसल्याने जालना जलसंपदा विभागाने पालिकेच्या (Parbhani) पंप हाऊसला टाळे लावले आहे. अजून देखील यावर तोडगा निघालेला नाही. ऐन उन्हाळ्यात शहराचा दहा दिवसांपासून पाणी पुरवठा (Water Crisis) बंद झाला असून नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. (Breaking Marathi News)

परभणी जिल्ह्यातील सेलू (Selu) नगरपालिकेने जलसंपदा विभागाची नळपट्टी भरलेली नाही. मार्च महिना असल्याने जलसंपदा विभागाकडून देखील वसुली केली जात आहे. यात नगरपालिकेकडे पाणीपट्टी बाकी असल्याने या विभागाने पालिकेच्या देवला येथील पंप हाऊसला टाळे ठोकले आहे. परिणामी शहरात दहा दिवसांपासून पाणी पुरवठा (Water Supply) बंद आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकत घ्यावे लागतेय पाणी 

मागील दहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही भागात टैंकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. परंतु, कामगार व मध्यमवर्गीय वस्तितील नागरिकांना पाणी विकत घेणे परवडणारे नाही. अशा परिस्थितीत मिळेल त्या ठिकाणाहून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT