Vasantrao Naik Marathwada Agricultural University Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News: फ्रॉड लिंकवर क्लिक करणं कुलगुरूंना पडलं महागात, तब्बल ११ लाखांचा गंडा

Vasantrao Naik Marathwada Agricultural University: परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ऑनलाइन फ्रॉडचे शिकार झाले आहेत. कुलगुरूंना तब्बल ११ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

Priya More

राजेश काटकर, परभणी

ऑनलाइन फ्रॉडच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यामुळे वारंवार नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. ऑानलाइन फ्रॉडच्या माध्यमातून चांगल्या सुशिक्षित लोकांची देखील लूट केली जात आहे. अशामध्ये परभणीमध्ये कुलगुरूच ऑनलाइन फ्रॉडचे शिकार झाले आहेत. कुलगुरूंना तब्बल ११ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर फ्रॉड लिंक पाठवून बँक खात्याची माहिती घेत कुलगुरूंची फसवणूक केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांची १० लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाइल वापरकर्त्यावर नवा मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे घरी काम करत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फ्रॉड लिंक पाठवली. त्यानंतर केवायसी डिटेल्स पाठवून ती देखील भरून मागवून घेतली. सर्व माहिती प्राप्त होताच डॉ. मणी यांच्या बँक खात्यातून १० लाख ९९ हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंद्र मणी यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jamun Recipe : वाढदिवसाला घरीच बनवा १० मिनिटांत गुलाबजाम, फक्त वापरा 'हा' एक पदार्थ

Shehnaaz Gill : शहनाज गिल लग्न करणार नाही? 'Ikk kudi'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने केलं मोठे विधान

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Maharashtra Elections : एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ, म्हणूनच लांडगे,कोल्हे,मांजरी..; शिवसेना आमदाराचा विरोधकांवर हल्लाबोल

Jio Special Offer: वाह! २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत १० OTT प्लॅटफॉर्म्स मोफत

SCROLL FOR NEXT