Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani : परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; रामपुरी गावात घरामध्ये पाणी, ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर

Parbhani News : संसार उपयोगी वस्तुसह पाण्याखाली वस्तू पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र असून जीव वाचविण्यासाठी ग्रामस्थ परिवाराला घेऊन जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झाले आहेत

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 

परभणी : राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. परभणी जिल्ह्यात देखील तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असल्याने पावसाने अक्षरशः कहर केला आहे. यात पाथरी तालुक्यातील रामपुरी गावाला पुराचा वेढा पडला असून संपूर्ण गावात पाणी शिरल्याने घरांमध्ये पाणी गेले आहे. यामुळे नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत राहण्यासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातत्याने पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रामपुरी गावात रात्री तीन वाजल्यापासून पाणी घुसल्यामुळे गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. 

संसार पाण्यात भिजला 

गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले आहे. घरातील वस्तू पाण्यावर तरंगत आहेत. तर गावात काही ठिकाणी अक्षरशः पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतीसह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील सर्व वस्तू या पाण्याखाली गेल्या असल्याने संसार पाण्यात भिजल्याचे चित्र सध्या गावात पाहण्यास मिळत आहे.  

नागरिकांना जिल्हा परिषदेत स्थलांतर 

घरांमध्ये पाणी शिरल्याने गावातील काही नागरिक आपले मुलं बाळ घेऊन जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झाले आहेत. गावात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देखील गावात ना लोकप्रतिनिधी ना प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी आला आहे. आम्ही स्वतःचा जीव लेकरा बाळांचा जीव वाचवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत आसरा घेतल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सकल आदिवासी समाजाचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

Shiny Hair: सुपर शाइनिंग केसांसाठी ट्राय करा हा घरगुती हेअर मास्क, दोन आठवड्यात दिसेल फरक

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

SCROLL FOR NEXT