Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

राजेश काटकर

परभणी : जिंतूर शहरातील खैरी प्लॉट भागात राहणाऱ्या (Jintur) एसटी महामंडळात मेकॅनिकल असलेल्या 35 वर्षीय कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आज (14 नोव्हेंबर) सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. (Breaking Marathi News)

जिंतूर शहरातील खैरी प्लॉट भागात राहणारे कैलास उत्तमराव कटारे हे एसटी महामंडळात मेकॅनिकल म्हणून काम करत होते. घटनेच्‍या दिवशी (Parbhani) सकाळी ते घराच्‍या बाहेर आले नाही. शिवाय सकाळी ड्युटीला आले नसल्यामुळे व मोबाईल उचलत नाही. म्हणून महामंडळातील कर्मचाऱ्याने नातेवाईकांना विचारले. यावरून घरात पाहणी केली असता कैलास कटारे यांनी घरात गळफास घेतल्याचे दिसून आले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी सहकारी पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे, बिट जमादार लीला जोगदंड, दिपक वातोडे, डुकरे यांच्यासह पाहणी करून पंचनामा केला. यावेळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपासातच सत्य काय ते समोर येईल. दरम्यान आत्महत्या केलेल्या कैलास कटारे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी असा परिवार आह़े. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये तथ्य नाही - शशिकांत शिंदे

Chest Pain: छातीत वेदना म्हणजे नेहमीच हार्ट अटॅक नसतो, डॉक्टरांनी सांगितलं त्यामागील कारण

केळी-सफरचंद नाही! 'हे' आहे जगातील सर्वात जुने फळ

Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

SCROLL FOR NEXT