Food Poisoning Saam TV
महाराष्ट्र

Food Poisoning: उपवासाच्या भगरीतून २० ते २५ जणांना विषबाधा; परभणी जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Food Poisoning News: भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीनिमित्त उपवास करणाऱ्या २० ते २५ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली.

राजेश काटकर

Parbhani Food Poisoning News

भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीनिमित्त उपवास करणाऱ्या २० ते २५ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात गुरुवारी (ता. ७) सायंकाळच्या सुमारास घडली. भगर खाल्याने अनेकांना मळमळ, चक्कर, उलटी व पोटात दुखणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं संपूर्ण जिल्हाभरात (Parbhani News) एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात गुरुवारी (ता. ७) काही जणांनी भागवत एकादशीचा उपवास केला होता. उपवासात भगर खाल्ल्याने त्यांना चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच मळमळीचा त्रास सुरू झाला.

हा प्रकार लक्षात येताच ७ जणांना उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, भगरीतून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाले. सध्या सातही जणांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

दुसऱ्या घटनेत गंगाखेड तालुक्यातून अशीच घटना समोर आली. उपवासात भगर खाल्ल्याने तालुक्यातील १२ ते १५ जणांना मळमळ, उलटी, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

एकाच दिवशी २० ते २५ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बाधित झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. महाशिवरात्रीनिमित्त उपवासात भगर खाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT