Parbhani Farmer News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News : कडाक्याच्या थंडीत पिकाला पाणी देण्यासाठी गेले; मात्र वाटेतच मृत्युने गाठलं

रात्रीची लाईट शेतकऱ्यांना देणे हे शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, तरीदेखील महावितरणाकडून शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात आहे.

राजेश काटकर

परभणी : रात्रीची लाईट शेतकऱ्यांना देणे हे शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, तरीदेखील महावितरणाकडून शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात आहे. आपली पिके वाळू नये म्हणून शेतकरी (Farmer) देखील रात्रीच्या अंधारात आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात घडली आहे. कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

वैजनाथ आबाजी आघाव (वय -60 वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आघाव हे वाई गावाचे (Parbhani) माजी सरपंच होते. सोमवारी रात्री ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतात गेले. मोटार चालू करून परत येतो असं कुटुंबीयांना सांगत ते घराबाहेर पडले. मात्र शेतात जात असताना, वाटेतच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पहाटेचे पाच वाजल्यानंतरही आघावर हे घरी परतले नसल्याने घरच्या मंडळींनी सोमवारी सकाळी शेतात जावून पाहणी केली असता ते मृत अवस्थेत आढळून आले. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने आघाव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वैजनाथ आघाव यांचा मृत्यू पडलेल्या थंडीने झाला असल्याचा अंदाज कुटुंबीया व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या रब्बी पीकाचा हंगाम सुरू असून शेतात गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके घेतली जात आहेत. मात्र, मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसोबत दुर्देवी घटना घडत आहेत.

Edited By Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT