Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : आरक्षणासाठी परभणी जिल्हा बंदची हाक; व्यापाऱ्यांकडून बंदला उत्स्फूर्त सहभाग

राजेश काटकर

परभणी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यासाठी मराठा युवकांची मोटारसायकल रॅली काढत दुकाने बंद करण्याचे आव्हान केले असून व्यापाऱ्यांनी बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. 

मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण (Maratha Aarkshan) मिळावे; या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज (Parbhani News) परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ह्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे..

तीव्र आंदोलनाचा इशारा 

मराठा आंदोलक मनोज जरागे यांची सहा दिवस चालू असलेल्या उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. यामुळे सरकारने जर उपोषणाची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानी दिला. सकल मराठा युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढत दुकानदारांना दुकानें बंद करण्याचे आव्हान केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Accident : ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

Dombivli News : प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन फळ विक्री; डोबिंवलीत विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, VIDEO

IND vs BAN: रोहितने मोडला सचिनचा महारेकॉर्ड! धोनीलाही सोडलं मागे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी ठरणार? कोणत्या पक्षाला किती जागा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Box Office India: या बॉलिवूड स्टारच्या चित्रपटांचा परदेशातही बोलबाला

SCROLL FOR NEXT