Parbhani Bribe case Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Bribe case : सही शिक्क्यासाठी लाच; ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Parbhani News : कामाचे धनादेश मिळावे यासाठी तक्रारदार मधुकर गोरे यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी आरटीजीएस फॉर्मवर सहीसह शिक्का देण्यासाठी १० हजारांची लाचेची मागणी

राजेश काटकर

परभणी : काम पूर्ण केल्यानंतर सदर कामाचे धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. हि रक्कम स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्यास परभणी एसीबीने रंगेहात पकडले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

मधुकर बाबूराव गोरे असे एसीबीने (ACB) ताब्यात घेतलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर काम कंत्राटदाराने पूर्ण केले. या कामाचे धनादेश मिळावे यासाठी तक्रारदार मधुकर गोरे यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी आरटीजीएस फॉर्मवर सहीसह शिक्का (Parbhani) देण्यासाठी १० हजारांची लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदारास हे लाच देणे मान्य नव्हते. 

तक्रारदाराने याबाबत परभणीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची खातरजमा करत एसीबीने सापळा रचला. यानंतर १० हजरांची लाच स्वीकारतांना ग्रामविकास अधिकारी गोरे यांना (Bribe) लाचेच्या रकमेसह एसीबीने ताब्यात घेतले. तसेच मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT