जिंतूरमध्ये जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट; दोन बालक गंभीर जखमी! SaamTvNews
महाराष्ट्र

जिंतूरमध्ये जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट; दोन बालक गंभीर जखमी!

दोघांनी जिलेटीन कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडल्या असता, जिलेटीन कांड्या फुटून भीषण आवाज झाला.

राजेश काटकर

परभणी : जिंतूर (Jintur) शहरातील एकलव्य शाळेच्या परिसरात राहणारे दोन शाळकरी विद्यार्थी खेळत असताना, उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्या त्यांच्या हाती लागल्या. जिलेटीनच्या (Gelatin) कांड्या हातात घेऊन त्याच्या वायरी या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या (Mobile) बॅटरीला लावल्या. यांनतर मोठा स्फोट (Blast) झाला. यामध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हाताला व डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. हि घटना आज सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली असून त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Parbhani News - blast of gelatin in Jintur; Two children seriously injured)

हे देखील पहा :

मात्र, एवढ्या स्फोटक कांड्या रस्त्यावर आल्या कोठून असा सवाल उपस्थित असून याबाबत महसूल व पोलीस प्रशासन अनभीज्ञ असल्याचे उघड झाले आहे. शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारा विद्यार्थी (Students) शेख असलम वय (11वर्ष) व अनस शाहेद पठाण (9 वर्ष) हे दोघेजण घराजवळ खेळत असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या कांड्या दिसून आल्या. यावेळी दोघांनी सदरील जिलेटीन कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडले असता जिलेटीन कांडी फुटल्याने मोठा आवाज झाला.

यावेळी अस्लम शेख याच्या हातात जिलेटीन असल्यामुळे संपूर्ण हाताला व डोळ्याला मोठी इजा झाली. तर, जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी (Parbhani) जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, जिलेटीन सारखी स्फोटके शहरातील नागरीवस्ती मध्ये भयंकर प्रकार घडल्यामुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभीज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT