Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News: महिलेचे हातपाय बांधून चोरीचा प्रयत्न; मानवत शहरातील घटना

Parbhani News : सासू आणि सून दोघीच घरी होत्या. पावणेसहा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला

राजेश काटकर

परभणी : मानवत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोदुगल्लीत एका घरामध्ये तीन चोरट्यांनी प्रवेश केला. (Parbhani) यावेळी घरात महिला एकटी होती. या महिलेचे हातपाय बांधून चोरी (Crime News) करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील गोदुगल्लीत स्टील व्यापारी सोमनाथ कडतन हे कुटुंबीयांसमवेत राहतात. दरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी आणि सून दोघीच घरी होत्या. पावणेसहा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. (Theft) चोरी दरम्यान अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चोरट्यांनी सोमनाथ कडतन यांच्या सुनेचे हातपाय बांधून घरातील साहित्य चोरी करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी कडतन यांच्या पत्नी घराच्या छतावर होत्या. त्यांना हा प्रकार समजला नाही. प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरट्यांनी ठोकली धूम 

दरम्यान, घाबरून चोरट्यांनी घरातून पळ काढल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सपोनि आनंद बनसोडे, पोउनि किशोर गांवडे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटना घडलेल्या घराच्या आजूबाजूला बाजारपेठ असताना अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न झाला, पोलिस (Police) या परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले असून, रात्री चोरी करण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढले असून, दिवसाही चोरीचे प्रयत्न होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

SCROLL FOR NEXT