Cotton Crop : कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनावर होणार परिणाम, शेतकरी अडचणीत

Parbhani News : दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली
Cotton Crop
Cotton CropSaam tv
Published On

परभणी : यंदा कमी पाऊस झाल्याने प्रत्येक पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. अशात देखील शेतकऱ्यांनी (Farmer) कपाशीचे पीक जगविले. यानंतर कपाशीचे चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीचा (Parbhani) एक- दोन वेचा झाल्यानंतर यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडण्यास सुरवात झाली आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. (Live Marathi News)

Cotton Crop
Gondia News: शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी; गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई

परभणी जिल्ह्यात कपाशीचा पेरा बऱ्यापैकी झाला आहे. परंतु लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पावसाने मोठा खंड दिला. नगदी पीक असलेल्या कपाशीवर (Cotton Crop) लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Crop
Bribe Trap : २ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी अडकला; ACB ने असा रचला होता सापळा!

शेतकरी आर्थिक अडचणीत 

यंदा सततच्या संकटांतून सावरण्यास निसर्गाने शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही. कपाशीवर शेतकऱ्यांनी तीन ते पाच वेळा महागडी औषधे फवारली केली. तरीही पात्या, बोंडे कमी प्रमाणात लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटू लागले. यात आता लाल्या रोग आल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला असून उत्पादनात घट होणार आहे. आता कृषी विभागाने रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com