Ambadas Danve Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; अंबादास दानवे यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; अंबादास दानवे यांचा आरोप

राजेश काटकर

परभणी : नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी परभणीत केला आहे. (Live Marathi News)

अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली (Parbhani) परभणीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्यात हजारोंच्या संख्येने ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांबरोबर जिल्ह्यातील (Farmer) शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी माध्‍यमांशी संवाद साधताना दानवे बोलत होते.

परभणी जिल्ह्यातील एकूण 90 टक्‍के गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु, सरकारने असे केले नाही. याच मुद्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर धारेवर धरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT