Dudhana Project Saam tv
महाराष्ट्र

Dudhana Project : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही लोअर दुधना प्रकल्प तहानलेलाच; प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के जलसाठा

Parbhani News : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर निम्न दुधनेत वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ २७ दलघमी इतकेच पाणी आले होते

राजेश काटकर

परभणी : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे बहुतांश धरणाची पाणी पातळी वाढली आहे. मात्र परभणी व जालना जिल्ह्यातील शहरासह शेकडो गावाची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना प्रकल्प पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही भरलेला नाही. चांगला दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के इतका पाणी साठा आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर निम्न दुधनेत वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पावसाळ्यातील (Rain) चार महिन्यात केवळ २७ दलघमी इतकेच पाणी आले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जून महिन्यापासून ४४ दलघमी एवढे पाणी आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात ९.७५ जिवंत जलसाठा आहे. दरम्यान, जून महिन्यात २०.७०, जुलैमध्ये २०.९० व ऑगस्ट महिन्यात ३ दलघमी अशी एकूण ४४ दलघमी एवढी पाण्याची आवक झाली असून धरण क्षेत्रात ५१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा 

अद्याप दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने प्रकल्प अद्यापही तहानलेला आहे. जून महिन्यापासूनच प्रकल्पात ४४ दलघमी एवढी पाण्याची आवक झाली आहे. समाधानकारक पाणी साठा न झाल्याने जालना व (Parbhani) परभणी जिल्ह्यातील अनेक गावांवर पाण्याच्या समस्या ओढवू शकते. यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून चांगला पाऊस पडल्यास प्रकल्पात पाणी साठा वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT