Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : ढालेगाव बंधाऱ्यात ६ टक्के पाणी; पाथरी शहरावर पाणी टंचाईचे सावट

Parbhani News : राज्यात यंदा सर्वत्रच सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. यामुळे अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर काही भागात धरणाची पाणी पातळी खालावली असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट उभे आहे.

राजेश काटकर

पाथरी (परभणी) : यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी संकट निर्माण होत आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील पाथरी (Pathari) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ढालेगाव बंधाऱ्याची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. यात केवळ ६ टक्केच पाणी असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. (Tajya Batmya)

राज्यात यंदा सर्वत्रच सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. यामुळे (Parbhani) अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर काही भागात धरणाची पाणी पातळी खालावली असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट उभे आहे. यासाठी कृती आराखळा तयार करून ट्रॅकरची सुविधा करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती पाथरी शहराची असून पाणी पुरवठा करणाऱ्या ढालेगाव बंधाऱ्याची पाणी पातळी खालावण्यास सुरवात झाली आहे. यामुळे एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी 

ढालेगाव बंधाऱ्यात आजरोजी केवळ सहा टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे ४० हजार लोकसंख्या असलेल्या पाथरी शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामधून ढालेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT