Dharashiv News : ज्वारीच्या शेतात पक्षासाठी पाणपोई; तरुण शेतकऱ्याचा उपक्रम

Dharashiv News : पावसाळ्यात व हिवाळ्याच्या दिवसात पक्षांना पाणी सहज मिळून जात असते. मात्र उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते. शेतात देखील पाणी भरण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पक्षांना पाणी मिळत नाही.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
 : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे पक्षांना पाण्याची शोधाशोध करावी लागते. याचमुळे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील तरुण शेतकरी (Farmer) महेबुब शेख यांनी आपल्या शेतात पक्षांसाठी पाणपोईची सुविधा केली आहे. यामुळे येथे पक्षांचा किलबिलाट दिवसभर पाहण्यास मिळतो. (Latest Marathi News)

Dharashiv News
Onion Export News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली

पावसाळ्यात व हिवाळ्याच्या दिवसात (dharashiv News) पक्षांना पाणी सहज मिळून जात असते. मात्र उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते. शेतात देखील पाणी भरण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पक्षांना पाणी मिळत नाही. यामुळे शेतात पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे. महेबूब शेख यांचे एक एकर क्षेत्रवरील ज्वारी पिकांची लागवड केली आहे. या शेतातच पक्षांसाठी जागोजागी कुंड्या बांधुन पक्षासाठी पाणपोईची सोय केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharashiv News
MSPची हमी शक्य नाही? समजून घ्या शेतीपासून बाजारापर्यंतचा संपूर्ण हिशोब

दरम्यान ऐकीकडे ज्वारीचे पक्षापासून सरंक्षण व्हावे; यासाठी शेतकरी गोफणगुंडा घेवुन पिकाची निगा राखताना शेतकरी शेख यांनी पक्षासाठी ज्वारीचे पिक पक्षासाठी खुले ठेवत जागोजागी पाण्याची सोय केली. पक्षांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबविल्याने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com