Shruti Vilas Kadam
एका कप पाण्यात १ चमचा तांदूळ आणि २-३ लवंगा घालून ५-७ मिनिटे उकळा. पाणी थंड झाल्यावर गाळून त्यात १-२ चमचे गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवा.
गुलाबाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा जाणवू शकतो. उन्हात किंवा बाहेरून आल्यानंतर हा मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे केल्यास त्वचा फ्रेश वाटते.
पाण्यावर आधारित हा मिस्ट त्वचेवर हलका ओलावा देऊ शकतो. मात्र, कोरड्या त्वचेसाठी तो मॉइश्चरायझरचा पर्याय नाही.
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि ताजीतवानी दिसू शकते. नियमित वापराने ग्लो येतो असा दावा केला जातो, पण त्यासाठी अधिक वैज्ञानिक पुरावे आवश्यक आहेत.
लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. मात्र, लवंग थेट त्वचेवर वापरल्याने चुरचुर किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.
तांदळाचे पाणी आणि गुलाबपाणी त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करून त्वचा तात्पुरती टाइट आणि स्मूद दिसण्यास मदत करू शकते. त्यामुळे ओपन पोर्स कमी दिसू शकतात. मात्र, पोर्स कायमचे बंद किंवा लहान होत नाहीत.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हे पाणी २-३ स्प्रे चेहऱ्यावर करा आणि नैसर्गिकरित्या सुकू द्या. दिवसातून एकदा वापरणे पुरेसे आहे. डोळ्यांजवळ स्प्रे करू नका आणि वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.