Lumpy Virus, Parbhani Saam Tv
महाराष्ट्र

Lumpy Skin Disease: चिंता वाढली! परभणी जिल्ह्यात वाढतोय लंपीचा प्रादुर्भाव, तब्बल ५ हजार जनावरे बाधित; ७६८ दगावली

Parbhani Lumpy Disease Update: परभणी जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

Gangappa Pujari

राजेश काटकर, प्रतिनिधी

Parbhani Lumpy Skin Disease:

परभणी जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील 144 गावांतील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आले असून आत्तापर्यंत एकूण 768 जनावरे दगावले आहेत. त्यामुळेच प्रशासनाने तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी (Parbhani) जिल्ह्यातील 144 गावांतील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण 768 जनावरे दगावले आहेत. विशेष म्हणजे या आजाराची जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 144 गावांमधील जनावरे लंपी बाधित आढळून आले आहेत. या गावांमध्ये 5 हजार 507 जनावरे बाधित आढळून आली. त्यापैकी 3 हजार 570 जनावरांवर उपचार करून ती बरी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इतर गावांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बाधित गावापासून पाच किमी परिघातील 626 गावे हे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

यामध्ये 2 लाख 80 हजार 397 जनावरांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजाराबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात येत असले तरी आतापर्यंत 768 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT