Dharmarao Baba Atram News : धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह त्यांचे भाऊ, जावयास नक्षल्यांची धमकी, पाेलीस सतर्क

वर्षभरात आत्राम यांना तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे.
Dharmarao Baba Atram
Dharmarao Baba Atram saam tv

-  मंगशे भांडेकर

Gadchiroli News : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram Latest Marathi News) यांना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धमकीचे पत्र पाठविले आहे. नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात धमकीचे पत्रक टाकल्याचे माहिती साम टीव्हीला प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

Dharmarao Baba Atram
Kokan Ganeshotsav : बाप्पा इलो रे... तळकोकणात बाप्पाचं जल्लाेषात आगमन

गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात आणि त्यांनतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी आत्राम यांच्या सुरक्षेची काळजी कडेकाेट घेतली जात आहे असे संदीप पाटील (डीआयजी, नागपूर गडचिरोली परिक्षेत्र) यांनी स्पष्ट केले हाेते.

Dharmarao Baba Atram
Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

आता पुन्हा एकदा नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात मंत्री आत्राम, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. गणेशाेत्सव काळात धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले.

हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पाेलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Dharmarao Baba Atram
Ganpati Onboard Godavari Express : गोदावरी एक्सप्रेसमध्ये बाप्पा विराजमान, सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास झुंबड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com