- विनायक वंजारे
Sindhudurg Ganpati Utsav : गणपती बाप्पा माेरया... मंगलमूर्ती माेरया...एक दाेन तीन चार...गणपतीचा जयजयकार असा गणरायाचा जयघाेष करीत आज (मंगळवार) तळकोकणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. उत्सवानिमित्त भक्तांचा उत्साह दांडगा असल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)
तळकोकणात (kokan) घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत भक्तीमय वातावरणात आणलं जात आहे. चाकरमानी सुद्धा तळकोकणात दाखल झाले आहेत. गणेशाेत्सवा निमित्त काेकणावासियांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71 हजार 789 घरगुती तर 35 सार्वजनिक गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव निर्विघ्न पणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व नियोजन करण्यात आले आहे.
एकूण 47 पोलीस अधिकारी, 250 पोलीस, आणि 350 होमगार्ड, दोन दंगल नियंत्रण पथक दिवस रात्र सुरक्षेसाठी उत्सव काळात तैनात करण्यात आली आहेत. एकूणचं सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.