parbhani krushi utpanna bazar samiti saam tv
महाराष्ट्र

Parbhani Krushi Utpanna Bazar Samiti : हमाली दरवाढीचा तिढा सुटला, परभणीत कापूस खरेदीस प्रारंभ

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (parbhani krushi utpanna bazar samiti) सभापती पंढरीनाथ घुले (pandhariath ghule) यांनी मध्यस्थी केल्यानंतर हमाली दरात 12.5 टक्के तर गठाण वरईच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्व सामान्य हमालांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. (Maharashtra News)

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कापूस जिनिंग प्रेसिंग संघटना व हमाल-माथाडी कामगार संघटना यांच्यात कापूस हमाली दर वाढीसंदर्भात ताेडगा निघत नव्हता. त्यामुळे हमाल कामगारांनी काम बंद ठेवले हाेते. त्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावरील कापूस खरेदीवर झाला.

आज बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी परभणी जिनींग प्रेसिंग कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व परभणी मजदुर हमाल युनियन (लाल बावटा), मराठवाडा हमाल माथाडी मजदुर युनियन (लाल बावटा) यांच्यातील जिनींग आवारातील प्रलंबित हमाली दरवाढी बाबत चर्चा केली.

त्यावेळी बाजार समितीचे संचालक गणेशराव घाटगे, विलासराव बाबर, सोपानराव मोरे, अरविंद देशमुख व फैजुल्ला खान यांची उपस्थिती हाेती. याप्रसंगी रावसाहेब रेंगे व मुंजाजीराव जवंजाळ हे उपस्थित होते.

परभणी बाजार पेठेत आजपासुन खाजगी व्यापा-यांमार्फत कापुस खरेदीस प्रारंभ झाला असून मार्केट यार्डात कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावुन जाहिर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित शेतक-यांनी त्या बाबतची सौदापट्टी घेऊनच संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत.

कोणत्याही प्रकारे जिनींग आवारात परस्पर वाहने घेऊन न जाता दुपारी टि.एम. सी. मार्केट यार्डात आणावीत. उशिराने येणा-या वाहनधारकांची निश्चीतच गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी बाजार समिती शेतक यांचे हितासाठी सदैव तत्पर असुन, शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीस आणतेवेळी कापुस ओला न आणता स्वच्छ स्वरुपात विक्रीस आणावा, चांगल्या प्रतीचा कापुस हा वेगळा व खराब प्रतीचा कापुस वेगळा करुन आणावा असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT