Long queues of tractors and vehicles seen at a petrol pump amid diesel shortage crisis in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

निर्लज्जपणाची हद्द पार! परभणीत डिझेलसाठी सातबाऱ्याची अट, पंप चालकाची संतापजनक अट

Maharashtra Fuel Crisis: परभणीसह मराठवाड्यात डिझेल टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. काही पेट्रोल पंपांवर सातबारा दाखवल्यानंतरच डिझेल दिले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात रांगा, गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

परभणी शहरासह जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून डिझेल टंचाई कायम असल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (Parbhani Diesel Shortage) शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक”चे फलक लागले असून ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. मागील 7 दिवापासून डिझेल नसल्याने नागरिकाचे हाल झाले आहेत. शेतीची कामे सुरू असताना डिझेलअभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक शेतकरी सकाळपासूनच कॅन आणि वाहनांसह रांगेत उभे राहत आहेत. काही ठिकाणी पंप चालकांकडून शेतकऱ्यांना सातबारा (7/12 Document Diesel) दाखवल्यानंतरच डिझेल दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. “सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या” अशी अट घालून पेट्रोलपंप चालकांनी निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा

सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टरही इंधन भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. इंधन टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी करत असून त्यामुळे पेट्रोल पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गालाही याचा फटका बसत असून शेतीची कामे प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाशिम मध्ये डिझेल घेण्यासाठी मध्यरात्री सुद्धा नागरिकांची गर्दी कायम...

वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून अनेक पेट्रोल पंपांवर कॅनच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या असताना मध्यरात्री सुद्धा डिझेलसाठी (Petrol Diesel Crisis) मोठ्या प्रमाणावर गर्दी कायम आहे. अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल होताच शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. मात्र तांत्रिक कारणामुळे डिझेल वितरणाला उशीर झाल्याने अनेकांना पहाटेपर्यंत पेट्रोल पंपावर थांबण्याची वेळ येणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे संतापले

दरम्यान परभणीमधील पेट्रोलपंप चालकांनी शेतकऱ्यांना सात बाराची अट घातल्याची बातमी साम टीव्हीने दाखवताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संताप व्यक्त केला असून परभणी मध्ये पेट्रोल पंप वाले जर सातबारा मागत असतील ते अत्यंत चुकीचा आहे. मी जिल्हाधिकारी यांना बोलो आहे .चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. डिझेल आणि पेट्रोलसाठा खूप आहे. शेतकऱ्यांना सांगतो त्यांनी घाबरू नका डिझेल पेट्रोल मिळेल. कुठल्या पेट्रोल पंपा वाल्याने जर असा निर्णय घेतला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurta Design: पावसाळ्यात फॅशनसोबत कम्फर्टही हवा? मग हे ७ कुर्ता डिझाईन्स नक्की ट्राय करा

TET पेपर फुटी प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड; 3 आरोपींना ठोकल्या बेड्या

Kolhapur Tourism : कोल्हापूरजवळील थंड हवेचे ठिकाण; पावसाळ्यात खुलतं सौंदर्य, आताच प्लान करा ट्रिप

Maharashtra Live Update: चंद्रपुरात भीषण अपघात; बस-ट्रकच्या धडकेत २२ प्रवासी जखमी

Acidity : पावसाळ्यात गॅस, ॲसिडीटी अन् अपचन? 'या' ज्यूसने पोटाला त्वरित मिळेल आराम

SCROLL FOR NEXT