Pabhani Crime  Saam TV
महाराष्ट्र

Pabhani Crime : नांदायला येत नाही म्हणून पतीचं पत्नीसोबत भयावह कृत्य; परभणीतील धक्कादायक घटना

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या मानेवर ब्लेडने वार केले.

राजेश काटकर

परभणी : नवरा बायकोमधील भांडण काही नवीन नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे भांडण जीवावर देखील उठतं. असाच एक प्रकार परभणी (Parbhani) जिल्ह्यात घडला आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या मानेवर ब्लेडने वार केले. या घटनेत पत्नी गंभीरित्या जखमी झाली आहे. (Parbhani News Today)

शोभा चव्हाण असे जखमी महिलेचे नाव आहे. शोभा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सेलू पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. रमेश नामदेव चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शोभा आणि रमेश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते.

या वादामुळे शोभा या माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. पती रमेश सतत भांडत असल्याने त्या सासरी येण्यास तयार नव्हत्या. दरम्यान, रविवारी रमेश हा पत्नीला आणण्यासाठी आपल्या सासरी गेला. नांदायला का येत नाही असे, म्हणत त्याने पत्नीच्या मानेवर ब्लेडने वार केले.

या घटनेत पत्नी शोभा गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर आरोपी रमेश हा फरार झाला असून सेलू पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT