Parbhani Crime
Parbhani Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime: अल्पवयीन मुलीस दूचाकीवर नेत अत्याचार; संशयीत सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

राजेश काटकर

परभणी : सेलू शहरातील दहा वर्षीय मुलीस व मावस भावास दूचाकीवर पळवून नेत मूलीवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना (Parbhani) सोमवारी दूपारच्या सुमारास घडली. सदरिल घटनेत दोन आरोपी विरोधात सेलू पोलिसात (Police) गून्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करत सोमवारी सकाळी अकरा वाजता शहरातील विद्यानगर येथून एका दहा वर्ष दहा महिने वय असलेल्या मुलीस व तिचा दहा वर्षाच्‍या मावस भावास दोन अज्ञात व्यक्तीने बळजबरीने पळवून नेले. मुलीच्‍या मावस भावास वालूर मार्ग कौसडी फाटा येथे रस्त्यावर सोडून दिले व मुलीस कोक शिवारात नेवून बळजबरिने (Crime) अत्याचार केला. या प्रकरणी पिढीतेच्या आईने सेलू पोलीसात रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्‍हीमध्‍ये दिसले संशयीत

प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांनी तपास सूरू केला असून या मार्गावरील सिसिटिव्ही (CCTV) फूटेज तपासले जात आहेत. यात एका दूचाकीवरून आरोपी हे मुलगी व मुलास दूचाकीवरून नेत असल्याचे दिसत आहे. दोन्ही आरोपींनी कपड्यांनी तोंड झाकले असून एकाचे शर्ट पिवळा तर दूसऱ्याचा लाल रंगाचा शर्ट दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT