Accident: बर्डीपाडा फाट्याजवळ टेम्पोचा अपघात; चालक गंभीर जखमी

बर्डीपाडा फाट्याजवळ टेम्पोचा अपघात; चालक गंभीर जखमी
Accident News
Accident NewsSaam tv

नंदुरबार : गुजरात राज्यातून नागपूरकडे (Nagpur) जाणारा प्लास्टिक मालने भरलेला टेम्पो पलटी होवून अपघात (Accident) झाला. बर्डीपाडा फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या टोलनाकाच्या दरम्यान वनवेने वाहनांची ये जा सुरू आहे. मात्र सदर टेम्पो सरळ मार्गाने जाताना रेती कपचीच्या ढिगार्‍यावर चढल्याने अपघात झाला. (Nandurbar Accident News)

Accident News
धुळे जिल्‍ह्यातील जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होत भीषण अपघात झाला आहे. या (Accident News) अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. वाहनातील प्लास्टिक मालही बाहेर फेकला गेल्याने. मालाचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विसरवाडी पोलीस व १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तत्काळ टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे.

विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com