Parbhani Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News: धक्कादायक! राजीनामा द्यावा यासाठी उपसरपंचाच्या कुटुंबाला मारहाण, जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Family Of Deputy Sarpanch Beaten Up: याप्रकरणी उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांच्या तक्रारीवरुन सेलू पोलिसांनी (Selu Police Station) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

राजेश काटकर, परभणी

Parbhani News: परभणीमध्ये (Parbhani) राजीनामा द्यावा यासाठी उपसरपंचाच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील काही तरुणांनी ही मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या उपसरपंचाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्यातील ब्राम्हणगावामध्ये घडली आहे. याप्रकरणी उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांच्या तक्रारीवरुन सेलू पोलिसांनी (Selu Police Station) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपसरपंच पदाचा राजीनामा द्या या कारणांवरून सरपंचासह इतर काही तरुणांनी उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये उपसरपंचांचा मुलगा निखिल कांबळे हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

परभणीच्या ब्राह्मणगावात ५ ऑगस्टला ही घटना घडली. उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांनी राजीनामा द्यावा यावरुन वाद झाला. या वादातच गावातील काही तरुणांनी उपसरपंचांचा मुलगा निखिलला रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये निखिल गंभीर जखमी झाला. त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपसरपंचांनी रविवारी रात्री उशिरा याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडो यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरुद्ध सेलू ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. मृत्यू झालेल्या निखिल कांबळेच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

SCROLL FOR NEXT