parbhani, gold, diwali , laxmi pooja,  saam tv
महाराष्ट्र

Laxmi Pujan : लक्ष्मीपूजना निमित्त परभणीकरांमध्ये साेने खरेदीचा मूड

दाेन वर्षानंतर दिवाळी सणाचा उत्साह परभणीकरांमध्ये दिसून येत आहे.

राजेश काटकर

Laxmi Pujan : दिवाळी निमित्त शहरातील मंदिरांमध्ये देव देवतांच्या दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दूसरीकडे लक्ष्मीपूजना निमित्त आज (साेमवार) परभणी शहरातील सराफ बाजारपेठ सजली आहे. बहुतांश सराफ दुकानांत साेने खरेदीसाठी गर्दी आहे. (Parbhani Latest Marathi News)

परभणीत यंदा वाहन, कपडे इतर खरेदी कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितलं. मात्र सोनं खरेदीला झुंबड उडालेली आहे. परभणी शहरातील सर्वच सराफा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर परभणीकरांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. (Maharashtra News)

परभणी शहरातील सराफा दुकानांत सोनं (gold) , चांदीचे विविध आभूषण खरेदीसाठी महिला, तरुणींची गर्दी झालेली पाहायला मिळाली. सोनं महाग असताना करण्यात येणारी ही खरेदी पुढच्या लग्नाच्या अनुषंगाने तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर केली जात आहे. नागरिक विविध डिझाईन्सला पसंती देत असल्याचे माहिती दिपक आंबीलवादे या सराफ व्यावसायिकांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT