Parbhani Accident News
Parbhani Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani : म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीचा भीषण अपघात; ७ जण जखमी, परभणीतील घटना

साम टिव्ही ब्युरो

राजेश काटकर

Parbhani Accident News : परभणीतून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. जिंतूर-परभणी रस्त्यावरील चांदज गावाजवळ वेगाने चारचाकी वाहनासमोर म्हैस आल्याने चालकाने तिला वाचवण्याच्या नादात अपघात झाला. ही घटना आज, मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. या अपघातात ७ जण जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

अपघात नेमका कसा झाला ?

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील काही नागरिक परभणी (Parbhani) येथे कामानिमित्त खासगी चारचाकी वाहन करुन गेले होते. काम संपल्यानंतर जिंतूरकडे परत येत असताना चांदजजवळील रस्त्यावर अचानक म्हैस वाहानासमोर आली. त्यामुळे चालकाने म्हैस वाचवण्याच्या नादात ब्रेक दाबल्याने वाहन उलटले. या अपघातात चालकासह ६ जण जखमी झाले. अपघाताची मिळताच १०८ रुग्णवाहिका चालक साजिद अन्सारी डॉ. अरुण लहाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात खासगी वाहन चालक आनीस खान महबूब खान पठाण (वय ४४, रा.जिंतूर),रामचंद्र किशन बिरगडे (वय ४५), मारोतराव रामराव माने (वय ७०),अच्युत विश्वनाथ थोरात (वय ४५), विजय गुलाब गडदे (वय ३५), देविदास विठोबा गडदे (वय ६३, सर्व रा. माणकेश्वर (चा.) व निवृत्ती नामदेव बनगर (वय ४५ रा. जिंतूर) या सात जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉ.श्रीमती दिपा परिहार, सिस्टर श्रीमती कांबळे,श्रीमती राठोड, रुग्णकक्षसेवक गंगाधर पालवे, आदींनी प्राथमिक उपचार केले. यातील निवृत्ती बनगर,चालक अनिस खान,विजय गडदे या तीन जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

SCROLL FOR NEXT