PM Modi Brother Accident: पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारला अपघात; मुलगा, सून, नातूही होते सोबत

प्रल्हाद मोदी त्यांच्या कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. प्रल्हाद मोदी यांचा मुलगा, सून आणि नातूही त्यांच्यासोबत कारमध्ये होते.
Accident News
Accident Newssaam tv

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला अपघात झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये त्यांची कार दुर्घटनाग्रस्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून होते. तिघेही जखमी झाले आहेत.

म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ हा अपघात झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. प्रल्हाद मोदी त्यांच्या कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. प्रल्हाद मोदी यांचा मुलगा, सून आणि नातूही त्यांच्यासोबत कारमध्ये होते. (Car Accident)

Accident News
Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये 'फॉग अटॅक', धुक्यामुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक; थंडीची लाट कायम

या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक किरकोळ जखमी झाले. म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

अपघातात त्यांच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघात होताच स्थानिक लोक बचावासाठी धावले. यानंतर प्रल्हाद मोदी यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी घटनास्थळी आल्या.

Accident News
Ajit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहून...'; अजित पवारांचा अधिवेशनात गौफ्यस्फोट

प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले प्रल्हाद मोदी म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com