Parabhani News  saam tv
महाराष्ट्र

Parabhani News : दहावीच्या पेपरचा अभ्यास करतानाच विद्यार्थीनीने घेतला गळफास; परभणीतील धक्कादायक घटना

Student hanged : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे इयत्ता दहावीच्या परीक्षा देणाऱ्या शाळकरी मुलीने स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Chandrakant Jagtap

Parabhani News : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे इयत्ता दहावीच्या परीक्षा देणाऱ्या शाळकरी मुलीने स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पंचनामा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोगाव देवी येथील शेतकरी विलास साखरे यांची मुलगी शीतल विलास साखरे वय 16 ही जिल्हा परिषद शाळा भोगाव देवी येथे शिक्षण घेत होती. तिने गुरुवारी दहावीचा पेपर देखील दिला होता. शुक्रवारी पेपर नसल्याने ती घरात पुढील पेपरचा अभ्यास करत होती. (Latest Marathi News)

दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास घरात एकटीच असताना तिने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना समोर येताच गावकऱ्यांनी तात्काळ पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने लटकलेला शीतलचा देह काढून प्राथमिक पंचनामा केला.

शीतलला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रोती कोडगीरे यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान परीक्षेच्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT