Parbhani News Saam TV
महाराष्ट्र

पांढरगावचा सुपुत्र जवान विष्णू बडे शहीद; गावकऱ्यांनी साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील विष्णू बडे हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणी: गंगाखेड तालुक्यातील (Gangakhed Taluka) पांढरगाव येथील विष्णू बडे हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. सिकंदराबाद येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यामुळे गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पांढरगाव येथील विष्णू व्यंकटराव बडे (३८) हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद येथे हवालदार पदावर कार्यरत होते.

डेंगी या आजारामुळे त्यांचा उपचारादरम्यान ८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. आज संत जनाबाई शाळेजवळील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंतयात्रेत शालेय विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ -

अंत्ययात्रादरम्यान देशभक्तीपर गीत व तिरंगा झेंड्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील दोन अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद बडे मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सैनिक संघटनेच्या सर्व माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यविधीच्या वेळी हजारो उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विष्णू बडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. विष्णू बडे यांचा मृत्यू झाल्याबद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT