राजेश काटकर, परभणी
Parabhani: परभणीच्या पुर्णा तालुक्यातील पुर्णा-ताडकळस महामार्गावरील कानडखेड शिवारातल्या बॉम्बे पुलाजवळ भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये हभप.रावसाहेब मुंजाजी ढोणे (58वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंगाधर रावसाहेब ढोणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाधर रावसाहेब ढोणे व हभप.रावसाहेब मुंजाजी ढोणे हे पिता पुत्र हटकरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच 22एटी 4658 या स्पेंल्डर गाडीवरुन निघाले होते.
पुर्णा-ताडकळस महामार्गावरील कानडखेड शिवारातल्या बॉम्बे पुला लगत समोरुन खुजडा येथून पुर्णेकडे भरघाव वेगाने चुकीच्या दिशेने येणाऱ्या हिरो होंडा चालक अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात हभप.रावसाहेब मुंजाजी ढोणे (58वर्षे )यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंगाधर रावसाहेब ढोणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातात धडक देणारा समोरील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रावसाहेब ढोणे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथे दाखल केले आहे.
तसेच समोरासमोर धडक देणाऱ्या दुचाकीस्वार जखमी युवकास नांदेड येथील शासकीय रुग्नालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Parabhani News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.