Beed News: हक्काची विमा रक्कम मिळेना; २ हजार रूपये देवून पाठवताय परत, शेतकऱ्यांमधून संताप

हक्काची विमा रक्कम मिळेना; २ हजार रूपये देवून पाठवताय परत, शेतकऱ्यांमधून संताप
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीडच्या केज तालुक्यातील आडसगावच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची जमा झालेली रक्कम देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (Live Marathi News)

Beed News
Shirdi News: नियुक्‍तीपत्र घेवून गेले विमानतळावर तर समोर आला धक्‍कादायक प्रकार; ११ जणांची फसवणूक

पावसाची दडी, येलोमोझ्याक, अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊनही (Crop Insurance) विमा कंपनीने सरसकट विमा द्यावा. अशी शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची मागणी आहे. आडस येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अजब अनुभव येत आहे. विमा पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ७ लाख ९२ हजार ३० रुपये अशी रक्कम आहे. स्लिप भरली की, त्यातील फक्त २ हजार रुपये दिले जात आहे.

पिक विमा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त केवळ २ हजार रुपये दिले जात आहेत. कॅश उपलब्ध नाही; असे कारण दाखवून शेतकऱ्याला परत पाठवत आहे. तर नशीबाने मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेने अडवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी मागील आठ-दहा दिवसांपासून बँकेच्या वाऱ्या करत आहेत. हक्काचे पैसेही मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले असून जिल्हा बँकेच्या गलथान कारभारा विरुद्ध असंतोष पसरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com