'...तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू;' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा Saam TV
महाराष्ट्र

'...तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू;' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा

'बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे.'

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde by Pankaja Munde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू -

सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT