Pankaja Munde 
महाराष्ट्र

Pankaja Munde Dasara Melava: निवडणुकीत पडले ते झालं, आता पाडणार; भगवान गडावरून पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

Pankaja Munde: सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जनसमुदायाला संबोधित केले.

Bharat Jadhav

Pankaja Munde Dasara Melava:

भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लढत राहणार असल्याचा निर्धार केला. या निर्धारासह पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांना इशारा दिलाय. निवडणुकीत पडले ते झालं, आता यापुढे त्यांना पाडणार असा इशारा त्यांनी दिलाय. (Latest News)

सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण लढा देत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच नाव न घेता त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला. जिंकून येण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही, असा घरचा आहेर त्यांनी पक्षाला दिलाय. २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदनात उतरणार असं म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणुका लढवण्याचे संकेत दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावल्यानंतर येत असल्याची चर्चा होती. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडेंनी परत एकदा कार्यकत्यांमध्ये नवचेतना भरली आणि नवीन उत्साहाने त्या कामाला लागल्या आहेत. मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावे लागेल.

माझ्यामुळे या स्टेजवर बसलेल्यांना त्रास कमी होतो पण माझ्या जनतेला जास्त त्रास होतो. दरवेळी तुमचा नेहमी अपेक्षा भंग होतो. त्यासाठी मी तुमची माफी मागते. आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होणार नाही. माझी माणसं आता संयम बाळगणार नाहीत. ते भगवान बाबांचे आणि शिवचं रुप आहेत. शिव शंकर हे भोळे जरी असले तरी त्यांना तिसरा डोळा असल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान २०१९ ची विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळीत पराभव झाला. त्यानंतर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं होतं. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी त्यांचे वर्तन कारणीभूत आहे. त्यांचा अंहकारामुळे त्या पराभूत झाल्या असं टिप्पणी राजकीय विश्लेषक करत होते. त्याला त्यांनी आजच्या मेळाव्यात उत्तर दिलं.

शिवशक्ती परिक्रमा केल्यानंतर मला मोठ प्रेम मिळालं. समाजातील सर्व घटकातून माझं स्वागत करण्यात आलं. आज मेळाव्यात देखील मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केलीय. आपल्याकडे काही नसताना सुद्धा इतक्या संख्येने कार्यकर्ते आले असं त्या म्हणाल्या.

फडणवीस यांच्यावर टोला ?

देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना डावलत असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. सत्तेत मंत्रिपदावर असताना देखील मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर फडणवीस आणि त्यांच्यातील शीत युद्ध सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दरम्यान पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी शक्ती प्रदर्शन करत आपलं राजकीय महत्त्व दाखवून दिलंय.

आजही त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना टोला लगावलाय. जिंकण्यासाठी नितीमत्ता गहाण ठेवली जातेय. परंतु आपण नीतीमत्ता गहाण ठेवणार शकणार नसल्यांच त्या म्हणाल्या. शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढल्यानंतर मला जो आदर मिळाला तो लोकांना पदे वाटून सुद्धा मिळाला नाही असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

SCROLL FOR NEXT