Recovered papers reveal a new twist in Dr. Gauri Palwe’s suicide case, intensifying allegations. saam tv
महाराष्ट्र

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Anant Garje Wife Gauri Palwe: अनंत गर्जे यांचे नाव असलेली कागदपत्रे सापडल्यानं गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मोठा वळण आले आहे. अनंत गर्जे हा एका दुसऱ्या महिलेच्या प्रेमात होता असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.

Bharat Jadhav

  • सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा धक्कादायक खुलासा

  • गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात तिसऱ्या महिलेची एंट्री

  • गर्भपाताच्या कागदपत्रावर अनंत गर्जेचं नाव

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागलंय. गौरी पालवे यांनी वरळी येथील राहत्या घरात गळफास घेतला. त्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावे केलेत. दमानिया यांच्या दाव्यामुळे गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आणखी एका महिले एंट्री झालीय.

गौरीला काही पेपर सापडले होते. ते गर्भपाताचे होते, ज्यावर किरण इंगळे नावाच्या महिलेचं नाव होतं. नवरा म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं, असं दमानिया यांनी सांगितलंय. तसेच गौरीला नेहमी मारहाण होत असायची, अशी माहिती रुग्णालयात काम करणाऱ्यांनी दिलीय. गौरीची मैत्रिणी सांगत होत्या की, ती रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून काम करत होत्या.

एक मैत्रीण तिला दीड वर्षांपासून ओळखते. पण फेब्रुवारीपासून आतापर्यंत तिने गौरीच्या शरीरावर अनेकदा मारहाणीच्या खुणा बघितल्या. तिला मारहाण व्हायची", असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी मयत डॉक्टर गौरी पालवे यांच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे दावे केलेत.

गौरी गर्जे आधी बीडीडी चाळीत राहत होते. जेव्हा त्यांना मोठ्या बहुमजली इमारतीमध्ये हलवण्यात आलं. तेव्हा वस्तूंची आवराआवर करताना गौरीला काही कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये एक कागद होता. त्यावर किरण इंगळे असे एका महिलेचे नाव होतं." ते कागदपत्रे एका रुग्णालयाची असून ते गर्भपात करण्याचा अर्ज होता.

किरण इंगळे या नावाच्या महिलेला गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या कागदावर किरण इंगळे हिच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे आहे. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाले. असे गौरीच्या आईवडिलांनी सांगितलं ", अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. अनंत अजूनही त्या महिलेसोबत चॅटिंग करत असल्याची माहिती गौरीला मिळाली. त्यामुळे ती तणावात होती. गौरीने अनंतची नणंद शीतलकडेही तक्रार केली.

पण नणंद तिला म्हणाली की, तुला राहायचे असेल, तर त्याच्यासोबत राहा. नाहीतर आम्ही त्याचे दुसरे लग्न करून देऊ. गौरीने याबद्दल तिच्या आईवडिलांना माहिती दिली. तिने अनंतच्या मोबाईलमधील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही तिच्या वडिलांना पाठवले होते", असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

SCROLL FOR NEXT