Pankaja Munde Nashik speech  SaamTV
महाराष्ट्र

Pankaja Munde : मी कोणत्याच गुंडाला घाबरत नाही, गुंडाला मी ही गुंड, बंडाला बंड; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

Pankaja Munde Nashik Speech : गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील.

Prashant Patil

नाशिक : जोपर्यंत लोकं सांगितलं तो पर्यंत काम करेल. लोकं नको म्हणतील तर घराच्या स्वतःच्या गादीवर बसेल. मी वंचित पिढीत कुटुंबात जन्मले नाही. मी कोणत्याच गुंडाला घाबरत नाही. गुंडाला मीही गुंड आहे, बंडाला बंड आहे, असं विधान भाजप नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

श्री. स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिकमध्ये झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले. या कार्यक्रमाला धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव, भाजप आमदार सीमा महेश हिरे, आणण्यासह मोरे, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, नद्या पुनर्जीविताचा विषय ते महाराष्ट्रात भाजप रुजण्यात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान अशा विषयांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले.

गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते, लोक गुणांचा स्वीकार करतात, लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात, त्यामुळे गुणांचा वारसा स्वीकारून ते माझ्याशी जोडले गेले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

शहरीकरण आणि नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

Vitamin B12: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

Mithila Palkar: हिरवी चोळी अन् दिसायला गोरी;मिथिलाचं नवं रुप प्रेमात पडाल

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

SCROLL FOR NEXT