योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : मागील काही महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणामुळे बीड जिल्हा गाजत आहे. सरंपच संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनाही लक्ष्य केलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रिपदही गेलं. दुसरीकडे बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याची टीका होत आहे. याचदरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीडमधील पाटोद्यातील एका कार्यक्रमात, मी बीड जिल्ह्याची नागीण आणि गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे, असं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे यांनी वक्तव्य करून बीडमधील राजकीय विरोधकांना ललकारलं आहे.
बीडच्या पाटोदा येथे संत मिराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मी भगवान बाबा यांनी अगोदरच महिलांना आरक्षण दिले. गोपीनाथ मुंडेंनी मला या संस्थांवर यायला सांगितले. आम्ही एकत्र आल्याने मोठे झालो आणि संस्थानही मोठे झाले. विकास झाला.
लोक असल्याने मी त्या ठिकाणी जाते. राजकरणात आणि धर्मकरणात नातं असलं पाहिजे. धर्मकारणातील व्यक्तींनी राजकारणात ढवळाढवळ करू नये.
कुंभातून उडी मारून पुन्हा पाप करायला तयार का? प्रयागराजमध्ये व्यवस्था खूप छान आहे. मला भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज लागत नाही, डोळे झाकले तरी दर्शन होते. भगवान बाबांची मूर्ती घट्ट धरून बसून पापी विचार असतील, तर दर्शन होणार नाही.
मी पर्यावरण मंत्री आहे. त्यामुळे फटाके वाजवू नका. माझ्या अंगावर फुले टाकली की मला पाकळी एक टनाची वाटते. मी बीड जिल्ह्याची नागीण आहे. तसेच गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे. तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत. मंत्री झाले किंवा नाही. मला काही फरक पडत नाही. मंत्री झाल्याने मी तुम्हाला न्याय देवू शकते.
राज्यात 1825 दिवस सत्तेचे आहेत. 1600 दिवसांत प्रत्येक दिवस या जिल्ह्याला 10 कोटी तरी विकासाला देईल.
आता मी पर्यावरण मंत्री आहे. महाराष्ट्रातील बीड माझं आहे. मला आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल. मला सारखं यावं लागेल. आष्टी भाजपचा मतदारसंघ आहे.
मी आष्टीत प्रत्येक कामात लक्ष देणार आहे. कामाला आणि उद्घाटनाला येणार आहे. अजिदादा पालकमंत्री आहेत. तसेच मी संपर्क मंत्री आहे. मला खोटं काम चालत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.