Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यावरून संघर्ष; जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे.

विनोद जिरे

बीड - भगवान गडावर (Bhagwangad) दसरा मेळावा घेण्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. कारण, भगवानगडावर दसरा मेळावा (Dasara Melava) घेऊ नये, असा ठराव भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड (Beed) जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे.

एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना, आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणजे जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतलाय. त्यामुळे अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केली आहे आणि याच माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे.

त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झालाय. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना व्यक्त करून जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT