Dasara Melava Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Dasara Melava Pankaja Munde: माझा आवाज कोणी दाबू शकणार नाही: पंकजा मुंडे

Pankaja Munde: सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.

Bharat Jadhav

सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. थोड्याच वेळात पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बीडमध्ये जनमुदायाला संबोधित करत आहेत. भगवान भक्तिगड ट्रस्टच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला. सभेआधी साडी-चोळी आणि पुष्पाहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी पंकजा मुंडेंचं व्यासपीठावर आगमन झालं.पंकजा मुंडेंचं सावरगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी अवघा जनसागर लोटला आहे. भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्याला हजारो समर्थकांच्या उपस्थितीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात काही दिवसांपूर्वीच त्यांनी परिक्रमा यात्रा काढून राज्यभर भेटी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.

तुम्ही कार्यक्रमात का आलात असा प्रश्न करत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना करत गर्दीचं कौतुक केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी आपल्या साखर कारखान्यावरील छापेमारीचा मुद्दा उपस्थित केला. कारखान्यावर कारवाई झाली तेव्हा माझ्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी धनादेश पाठवला, असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

शेतकरी आनंदात आहेत का? विमा मिळाला का? अनुदान मिळाले का?

शेतमजुरांना शेतात काम आहे का?

महाराष्ट्रात आज एवढे गंभीर प्रश्न आहेत

मराठा अरक्षम प्रश्न गंभीर झाला असताना अपेक्षा भंग आता अपेक्षा भंग करण्याची ताकद संपली आहे.

मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते.

जेवढं परळीला दिली तेवढं पाथर्डीला दिलं.

माझ्यामुळे कार्यकत्यांना त्रास होतो. ज्यांना पद मिळत त्यांना त्रास होत नाहीत. परंतु माझ्यामुळे कार्यकर्त्यांना त्रास होतो.

शिवशक्ती परिक्रमा काढली तेव्हा मला लोकांच्या भावानाचा साक्षात्कार झाला.

शिवशक्ती परिक्रमा केली, तेव्हा मला वाटलं नव्हतं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल. शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचे काम माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केले.

माझ्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे हे उपकार मला फेडता येणार नाहीत.

मी कामात करताना निवडणुकांमध्ये पडले. कधीतरी राजकारणात पडतात ना

पडल्यावर कुबड्या घ्याव्या लागतात. त्या पार्टी किंवा लोकांच्या कुबड्या घायव्या लागतात, त्या लोकांनी दिल्या. निधी देताना कधी जात धर्म पाहिला नाही

मी कामात करताना निवडणुकांमध्ये पडले. कधीतरी राजकारणात पडतात ना

पडल्यावर कुबड्या घ्याव्या लागतात. त्या पार्टी किंवा लोकांच्या कुबड्या घायव्या लागतात, त्या लोकांनी दिल्या.

कोणी म्हणते ताई या पक्षात जाणार कोणी म्हणते त्या पक्षात जाणार, पण पंकजा मुंडे यांची निष्ठा लेचीपेची नाही.

आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर आता उन्हात बांधू. आता माझी माणसे सायांम दाखवणार नाहीत. त्याचं रूप शिवशनकर आहे. त्यालाही तिसरा डोळा आहे

शिवशक्ती परिक्रमा काढली तेव्हा मला लोकांच्या भावानाचा साक्षात्कार झाला.

आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर आता उन्हात बांधू. आता माझी माणसे सायांम दाखवणार नाहीत. त्याचं रूप शिवशनकर आहे. त्यालाही तिसरा डोळा आहे

शिवशक्ती परिक्रमा काढली तेव्हा मला लोकांच्या भावानाचा साक्षात्कार झाला.

जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. राजकारणात माझ्या लोकांचे हित बघणे माझे परम कर्तव्य आहे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही.

माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरली असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम मी करणार नाही.

१० वर्ष झाली तरी गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मारक सरकारकडून झालं नाही.

राज्याला स्थिरता हवी

ड्रग्ज तस्करांचा नायनाट करा.

पडले ते झाले आता पाडणार

माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही.

आता मी घरी बसणार नाही. तुम्हाला मी मैदानात कोण असणार याचा निर्णय तुम्ही ठरवणार आहात. मी थकणार, न रुकणार, मी कोणासमोर झुकणार, मी मातणार , घेतलेला वसा टाकणार नाही.

मी शेवटच्या श्वासपर्यंत लढणार .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT