Pankaja Munde Saam Digital
महाराष्ट्र

Pankaja Munde : नारायण गडावरील जरांगेंच्या दसरा मेळाव्याचं कौतुक, पण...; ओबीसी-मराठा संघर्षावर पंकजा मुंडेंचं मोठं विधान

Pankaja Munde On Manoj Jarange : भगवान गडावर आज दसरा मेळावा पार पडत आहे. मात्र मनोज जरांगेंही नारायण गडावर मेळावा घेणार आहेत, त्याबाबत पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

Sandeep Gawade

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भगवान गडावर आज दर दसरा मेळावा पार पडत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा परंगरागत मेळावा असला तरी मनोज जरांगेंही नारायण गडावर मेळावा घेणार आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याला ओबीसी मराठा असं काहीसं चित्र पहायला मिळणार आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी जरांगेंच्या मेळाव्यावर मोठं विधान केलं आहे.

यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे. पंकजा मुंडे यांच्याकडुन मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचं कौतुक. नारायण गडावरील मेळावा हे यावेळंच दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य असणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे. गडावर भगवान बाबांचीमूर्ती निर्माण केली आहे. दरवर्षी आम्ही तिथे जातो सोनं लुटतो आणि सिमोलंघन करतो. धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही. दसरा मेळावा हा मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसत होतो. आम्ही काय भाषण करत नव्हतो. आता आम्हाला सवय झाली आहे एकाच मंचावर येण्याची. या भगवानगडावरून मी संदेश देत असते.

भगवान गडावरील आमचा मेळावा पारंपारिक आहे. तो मेळावा काही पारंपारिक नाही. ओबीसी मराठा संघर्षावर मी माझ्या भाषणात बोलणार आहे. मात्र ओबीसी मराठा संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो, मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नाही. मात्र माझ्या भाषणातून सामाजिक, राजकीय संदेश नक्की दिला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Fridge Cleaning : तुमच्या फ्रिजमधून दुर्गंध येतोय? तर वाचा हे सोपो घरगुती उपाय

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT