Pandharpur Wari
Pandharpur Wari  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घ्या कार्यक्रम

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Ashadhi wari) संत तुकाराम महाराज यांची पालखी २० जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच पालखी पालखी सोहळा साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी तिथीवाढ आहे. त्यामुळे संत तुकोबा महाराजांची पालखी मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. यंदा तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती सोहळा समितीने दिली आहे. कोरोना (Corona) विषाणुमुळे तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच पालखी पालखी सोहळा आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवणार आहे.

पंढरपूर आषाढी वारी २०२२ वेळापत्रक कार्यक्रम

संत तुकाराम पालखी कार्यक्रम

१) पालखी प्रस्थान २० जून रोजी होणार आहे.

२) पहिलं गोल रिंगण ३० जून रोजी बेलवंडी येथे होणार आहे.

३) दुसरं गोल रिंगण २ जुलै रोजी इंदापूर येथे होणार आहे.

४)तिसरं गोल रिंगण ५ जुलै रोजी अकलूज माने विद्यालय येथे होणार आहे.

५) पहिलं उभं रिंगण ६ जुलै रोजी माळीनगर येथे होणार आहे.

६) दुसरं उभं रिंगण ८ जुलै रोजी होणार आहे.

७) तिसरं उभं रिंगण ९ जुलै रोजी होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कार्यक्रम

१) संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान २१ जून रोजी होणार आहे.

२) या पालखीचा २२, २३ जून रोजी पुण्यात मुक्काम असेल.

३) पुढचा पालखीचा मुक्काम २४, २५ जून रोजी सासवड येथे असणार आहे.

४) जेजुरी येथे २६ जून रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

५) वाल्हे येथे २७ जून रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

६) लोणंद येथे २८, २९ जून रोजी लोणंद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

७) ३० जून रोजी तरडगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

७) फलटन येथे १, २ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

७) बरड येथे ३ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

९) माळसिरस येथे ५ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

१०) वेळापूर येथे ६ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

११) भंडीशेगाव येथे ७ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

१२) वाखरी येथे ८ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

१३) पंढरपूर येथे ९ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे.

१४) १० जुलै रोजी आषाढी एकादशी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे.

दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आषाढी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होत आहे. आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी बांधव पंढरपूरमध्ये येत आहे. त्यामुळे येणारी गर्दी विचारत घेता योग्य त्या उपाययोजना, खबरदारी, सुरक्षा, आरोग्य याबाबत आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramda Athawale on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे तुमचे नखरे, रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

Shiv Sena UBT: मुलुंडप्रकरण तापलं! ठाकरे गटाच्या 5 जणांना अटक, नेमका ठपका काय?

Periods Tips: मासिक पाळी दरम्यान या चुका करू नका, नाहीतर...

Today's Marathi News Live: महायुतीने सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केलं; अरविंद सावंत

Ramdas Athawale : मविआला देत आहोत अशी टक्कर की, नेत्यांना आली पाहिजे चक्कर; आठवलेंचा चारोळीतून विरोधकांना भन्नाट टोला

SCROLL FOR NEXT