Pandharpur Vitthal Rukmini Temple donation box found foreign currency of 12 countries
Pandharpur Vitthal Rukmini Temple donation box found foreign currency of 12 countries Saam TV
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Temple: पंढरपूरच्या विठ्ठलाची किर्ती सातासमुद्रापार; दानपेटीत तब्बल १२ देशांचे परकीय चलन

भरत नागणे

Pandharpur Vitthal Rukmini Temple News

पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत आहे. वारकऱ्यांचं कुलदैवत म्हणून विठुरायाची ओळख आहे. आता याच विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची किर्ती सातासमुद्रापार गेली आहे. पंढरपुरात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिराच्या दानपेटीत परदेशी चलनाचं प्रमाण देखील वाढलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील वर्षभरात मंदिराच्या दानपेटीत तब्बल १२ देशांचं परकीय चलन मिळालं आहे. मंदिर समितीने याबाबतची माहिती दिली आहे. वर्षभरात देश विदेशातून जवळपास १ कोटीहून अधिक भाविक पंढरपुरात (Pandharpur News) येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात.

अलीकडे विठ्ठल दर्शनासाठी (Vitthal Rukmini Temple) येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,गोवा यासह इतर प्रमुख राज्यातून मोठ्या संख्येने येतात. यासोबत परदेशी भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आषाढी -कार्तिकी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी तर विदेशातील अनेक पर्यटकही पंढरपुरात येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्षभरामध्ये अमेरिका, कतार, नेपाळ, सिंगापूर, अरब देश, न्यूझीलंड, इंग्लंड ,सुदान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश, इंडोनेशियामधून भाविक पंढरपुरात येऊन गेले आहेत.

या भाविकांची माहिती परदेशी चलनावरून मिळाली आहे. विठुरायाच्या दर्शनासोबत परदेशी भाविकांनी भरभरून दानही दिलं आहे. विदेशातील भाविकांकडून वर्षभरात जवळपास १ लाख रुपयांची देगणी मिळाली आहे.

हैदराबाद येथील बालाजीच्या दर्शनासाठी सर्वाधिक भाविक येतात. त्यानंतर शिर्डीतही परदेशी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. त्यातच आता पंढपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठीही परदेशी भाविक येत असल्याने पंढरपूर हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनू लागल्याचे समोर आले आहे.

Edited by - Satish Daud Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT