Vitthal Rukmini Mandir in Padharpur News  Saam TV
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir: नववर्षानिमित्त सजला विठुरायाचा गाभारा; मंदिरात फळा-फुलांची आकर्षक सजावट

Vitthal Rukmini Mandir News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजले आहे. मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Satish Daud

Vitthal Rukmini Mandir in Pandharpur

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजले आहे. मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा फळा, फुलांची भरून गेला आहे. पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने ही सजावट केली आहे. या सजावटीमुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने व्हावी यासाठी राज्यभरातून हजारो भाविक रविवारी (३१ डिसेंबर) रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावत विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या नाम-गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळा-फुलांची सजावट करण्यासाठी झेंडू ,गुलाब, आस्टर, मोगरा, गुलछडी यासह विविध देशी विदेशी सुमारे २ टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी आणि सभामंडपामध्ये सजावट करून मंदिर आकर्षक बनवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab Photo: रूप तेरा मस्ताना! शिवालीचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढेल

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

SCROLL FOR NEXT