pandharpur , pandharpur vitthal rukmini mandir
pandharpur , pandharpur vitthal rukmini mandir saam tv
महाराष्ट्र

VITTHAL RUKMINI MANDIR : पस्तीस वर्ष वारक-यांचा भार झेलणारा सात मजली दर्शन मंडप हाेणार जमीनदाेस्त (पाहा व्हिडिओ)

भारत नागणे

Pandharpur : पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल रुक्मिणी (vitthal rukmini mandir) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या (devotees) सोयीसाठी बांधण्यात आलेला सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. आगामी काळात येथे पार्किंग व कार्यालय उभारण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

सन 1987 मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुमारे 35 हजार भाविकांची क्षमता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दर्शन रांगेसाठी या संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचा वापर सुरू होता.दरम्यान अपुऱ्या सोयीमुळे हा दर्शन मंडप मागील अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. काही ठराविक भागाचा दर्शन रांगेसाठी वापर केला जातोय.

दरम्यान आता नव्या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिरा शेजारी असलेला हा दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी पार्किंग आणि मंदिर समितीचे भव्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष, वारकरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांची एक बैठक सोलापुरात पार पडली. या बैठकीमध्ये दर्शन मंडप पाडण्यासह मंदिर परिसरातील इतर विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

याबाबत लवकरच पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे देखील एक बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT