pandharpur, vitthal mandir saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंढरपूरात व्यापा-यांचा कडकडीत बंद

हा बंद एक दिवसाचा असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.

भारत नागणे

Pandharpur : पंढरपुर विकास आराखड्याच्या विरोधात आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir) परिसरातील व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवली आहे. व्यापा-यांनी पाळलेल्या कडकडीत बंदमुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

पंढरपुरात तीर्थ क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यात विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते रूंद केले‌ जाणार आहेत. याला मंदिर परिसरातील व्यापा-यांचा विरोध आहे. त्याबाबत व्यापा-यांनी प्रशासनास कळविले आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंढपूरातील विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापा-यांनी आज दुकानं बंद ठेवली आहे. सर्व व्यापा-यांनी विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आजचा आमचा एक दिवसाचा लाक्षणिक बंद आहे असे व्यापा-यांनी म्हटलं आहे. दरम्यान मंदिर परिसरातील प्रासादिक वस्तू विक्रीची दुकानांसह हाॅटेल बंद असल्याने भाविकांची गैरसोय झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

SCROLL FOR NEXT