Pandharpur VIP darshan controversy latest news 
महाराष्ट्र

Pandharpur VIP Darshan : पंढरपुरात VIP दर्शनावरुन वाद, मंत्री-आमदारात भेदभाव केल्याची चर्चा

Pandharpur VIP darshan controversy latest news : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे.

Girish Nikam

Sudhir Mungantiwar reacts to VIP darshan issue : सगळ्यांनाच पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. मात्र पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरुन वाद निर्माण झालाय. पांडुरंगाच्या दर्शनावरुन मंत्री-आमदारात भेदभाव झाल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले आहेत. पाहूया एक रिपोर्ट

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक दर्शन घेतलं मात्र त्यांच्या बरोबर असलेल्या १० लोकांना दर्शन घेता आलं नाही. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह समर्थकांना मात्र थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याने नाराजीनाट्य रंगलं. मंदिरात समन्वयाचा अभाव आहे, अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली. तर मंत्र्यांना जबाबदाऱ्या जास्त आहेत. गैरसमज करू नये, अशी सारवासारव गुलाबराव पाटलांनी केली आहे.

VIP दर्शन नाकारलं, मुनगंटीवारांची खंत

'मंदिरात समन्वयाचा अभाव'

सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

'जबाबदाऱ्या जास्त, गैरसमज करू नये'

गुलाबराव पाटील, मंत्री, शिंदेसेना

तर VIP दर्शन वादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.

दरम्यान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते गुरुवारी विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला. आता देवाचे राजोपचार बंद राहणार असून फक्त नित्योपचार केले जातात. 3 ऑगष्ट पर्यंत भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. या बरोबरच दर्शन रांगेतील भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केलंय. 25 जुलै रोजी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुख्मिणीची पूजा होणार आहे. पांडुरंगाच्या चरणी सगळेच समान आहेत. अवघा जनसागर पंढरपुरकडे लोटलेला असताना मंदिर व्यवस्थापनानं कोणाची गैरसोय होणार नाही, वाद होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Drink: १५ दिवस लिंबू- लसून अन् हळदीचे पाणी प्यायल्याने काय होते?

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT