Accused Gram Panchayat worker arrested by police in connection with a two-year-long blackmail and abuse case in Pandharpur. saam tv
महाराष्ट्र

पंढरपूर हादरले! अंघोळीचा व्हिडिओ काढून महिलेवर दोन वर्ष अत्याचार; ग्रामपंचायत शिपायाला अटक

Woman Blackmailed With Bathing Video In Maharashtra: पंढरपूरमधील धक्कादायक प्रकरण उघड; अंघोळीचा व्हिडिओ काढून महिलेवर दोन वर्षे अत्याचार. ग्रामपंचायत शिपायाला अटक, पोलिसांची तत्काळ कारवाई.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून, तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकलूज पोलिसांनी गिरझणी ग्रामपंचायतीचा शिपाई उमेश जगन्नाथ साठे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश साठे याने पीडित महिला अंघोळ करत असताना आपल्या मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ चोरून चित्रित केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. याच भीतीपोटी पीडितेने गप्प राहण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या काळातही त्याने पीडितेचे आणखी अश्लील व्हिडिओ काढून तिला सतत ब्लॅकमेल केले.

पीडितेच्या पतीला काही दिवसांपासून संशय येत होता. त्यांनी पत्नीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने रडत सर्व आपबिती सांगितली. हा धक्कादायक प्रकार समजताच पीडितेने पतीसह अकलूज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून अकलूज पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी उमेश जगन्नाथ साठे याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे माळशिरस तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी धाड टाकत २ प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघांना घेतलं ताब्यात

Maharashtra News Live Update: वसई विरार शहरात पावसाची मध्यरात्रीपासूनच जोरदार बॅटिंग

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये नवा ट्विस्ट! सत्य समोर आणण्यासाठी सायलीचा जीवघेणा प्लॅन

PF Withdrawal Rule: EPFO 3.0 मुळे पीएफ काढणं सोपं झालं , पण रिटायरमेंटआधी सतत पैसे काढल्याने होईल नुकसान; वाचा सविस्तर...

Cancer tumor growth: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना ही ५ मोठी लक्षणं पायांमध्ये दिसतात

SCROLL FOR NEXT