Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pandharpur News : सांगोल्यात उबाठा गटाने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे

भारत नागणे

पंढरपूर : सांगोल्यात शेकापने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. यावर निशाणा साधताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी कामगार पक्ष हा भाजपची बी टीम असून येथील शेकपचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांनी उभा केला असल्याचे मोठं वक्तव्य केले आहे.

सांगोल्यात (Sangola) उबाठा गटाने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर शिवसेनेने आमदार शहाजी पाटील यांना पुन्हा संधी‌ दिली आहे. येथील जागेवरून उबाठा आणि शेकापमध्ये चांगलेच जुंपले आहे. या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेकाप ही भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

तो उमेदवार फडणवीसांचा 

एवढेच नाही तर सांगोल्यात उभा करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस म्हणून उभा असल्याचा खासदार राऊत यांनी दावा केला आहे. राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव
दरम्यान सांगोल्यातील अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांच्यावर विरोधी गटाकडून पाठिंब्यासाठी दबाव टाकला जात आहे; अशी तक्रार अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी केली आहे. घरासमोर गोंधळ घातला जात आहे. माझा जिवीताला धोका निर्माण झाला आहे; अशी लेखी तक्रार अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT